वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
- शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येते.
- अर्जदाराचे किमान वय वर्षे 18 ते 50 असावे. तसेच अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
- बँकांकडून कर्जमर्यादा रु.10.00 लक्षपर्यंत.
- बँकेने रु.10.00 लाखांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12% च्या मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीवर राबविण्यात येईल. व्यवसायाच्या स्वरुपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल.
- कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- वेब पोर्टल / महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नांव नोंदणी करणे अनिवार्य असेल.
- कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषानुसार असेल.
- अर्जदाराने महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (एलओआय)प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करुन घ्यावे लागेल.
- जर अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
- अर्जदाराने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान 2 फोटो अपलोड करावेत.
- अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेयरच्या मर्यादेत असावी.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. लिंक
लाभार्थी:
--
फायदे:
--
अर्ज कसा करावा
ऑनलाईन योजनेकरीता अर्ज करण्याची कार्यपध्दती :-
1) अर्जदाराने वर दिलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. या महामंडळाच्या संकेतस्थळावरील लिंक वर क्लिक करावे.
2) ओपन होणाऱ्या विंडोमध्ये होम मेन्यु वर क्लिक करून आवश्यक ती प्राथमिक माहिती भरावी.
3) क्रिएट / एडिट प्रोफाईल ची विंडो ओपन होईल त्यामधील माहिती कन्फर्म करून साईन अप करावे.
4) साईन अप केल्यानंतर अर्जदारास नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल.
5) प्राप्त झालेल्या युजर आयडी व पासवर्ड च्या सहाय्याने भरलेली प्राथमिक माहिती सबमिट करावी.
6) पोर्टलवर दिसणाऱ्या डँशबोर्ड मधील योजनांपैकी ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यावरील अप्लाय बटणवर क्लिक करावे.
7) रजिस्ट्रेशन साठी ओपन होणाऱ्या विंडो मध्ये अर्जदाराने पर्सनल डिटेल्स / ॲड्रेस / फॅमिली डिटेल्स / बँक अकाऊंट डिटेल्स / लेंडिंग लोन डिटेल्स / अपलोड डॉक्युमेंटस् / डिक्लरेशन व समरी या टॅब अंतर्गत नमूद असलेली माहिती भरून अर्ज सबमिट करावा.